उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची धोत्रा देवस्थान येथे भेट
सिल्लोड (विवेक महाजन,तालुका प्रतिनिधी ) तालुक्यातील आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज येथे श्रींची 107 वी समाधी पुण्यतिथी सोहळा निमित्त पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी धोत्रा येथे भेट दिली. यावेळी संस्थानच्या वतीने उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे संचालक सतीष ताठे, नगरसेवक राजू गौर, अखिल देशमुख, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती पा.वराडे, राजू बाबा काळे, रामेश्वर काळे, अन्वी सरपंच डॉ. नाना भवर , पानवडोद सरपंच गजानन पन्हाळे, जीवनसिंग जाधव, हट्टी चे चेअरमन नरसिंग जाधव ,मंगेश वराडे यांच्यासह माजी सरपंच विठ्ठल जाधव, आनंद जाधव, विशाल जाधव ,राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती.