औसा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार श्री.अभिमन्यु पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा – प्रा. अशोराज तायडे यांचे मतदारांना आव्हान

विशेष प्रतिनिधी – दिनांक १५-११-२०२४ आज रोजी महाराष्ट्र विधान सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या भाजप पक्षाचे उमेदवार श्री.अभिमन्यु पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान प्रजशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांनी आज रोजी मतदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.
हि निवडणूक हि महाराष्ट्र हिताची असून गेल्या काळात महायुती सरकार ने राज्यात जे काम केले ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाठी महत्वाचे ठरले आहे. ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव होणार असून त्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले असेही प्रा. अशोराज तायडे ह्यावेळी बोलले तरी येत्या २० नोव्हेंबर ला महायुतीला भरभरून मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा अशी विनंती त्यांनी ह्या वेळी मतदारांना केली.