भुसावळ येथे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा.
"सर्व सामान्य मानवाचा अधिकारासाठी नेहमी प्रयत्नशील राहू" - विनोद शर्मा प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना भुसावळ तालुका अध्यक्ष.
दिनांक ११ डिसेंम्बर २०२२
भुसावळ: प्रतिनिधि
भुसावळ : दि. १० डिसेंम्बर रोजी भुसावळ येथील राम मंदीर परिसरात अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना नवी दिल्ली चे संस्थापक श्री दिलीप मोहिते व महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री शशिकांत दुसाने यांच्या विद्यमानाने भुसावळ तालुका अध्यक्ष श्री विनोद शर्मा यांनी सर्व जाती धर्माचा लोकांचा उपस्थितीत कार्यकमाचे आयोजन केले. संविधानाचे जनक विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यकमाची शुरुआत करण्यात आली.
मंच वर प्रमुख अथिती श्री जयप्रकाश शुक्ला, श्री जे. बी. कोटेचा, श्रीमती ज्योती शर्मा, श्रीमती बबीता शर्मा व श्रीमती सरिताताई चौक उपस्थित होते. प्रमुख अतिथी जयप्रकाश शुक्ला यांनी मानवाधिकार दिवसची सविस्तर माहिती तसेच संबोधन केले.
कार्यकमाचे संचालन “स्पीडन्यूज महाराष्ट्राचे” पत्रकार श्री अखिलेशकुमार धिमान यांने तर आभार श्री जे.बी. कोटेचा यांनी व्यक्त केले.
सदर कार्यकमास सुनील ठाकुर,संतोष जगताप,सुनील दाभाडे,मुरलीधर पाटील,पुंजो सोनवणे आदी मंडळी उपस्थित होते.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.