खळबळजनक:पतिच्या भांडणाला कंटाळून पत्नीनेच केला पतिचा खून.
बोदवड:प्रतिनिधि
दिनांक: १३ डिसेंबर २०२२
भांडण’ हा शब्द पुर्वानुकालापासून आपल्या कानावर ऐकायला येतो. आपल्या घरी असणारे ‘आजी-आजोबा’, ‘आई-बाबा’, ‘काका-काकू’ आपल्याला भांडताना दिसतात. चार चौघांकडून सुद्धा हेच ऐकायला मिळतं जिथे चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच! अशी भांडणाऱ्याची समजूत घालतात. समाजातील जनमानसाकडून आपल्या मनःपटलावर हे बिंबवले जाते की ‘नवरा-बायको’ एकत्र असतील तर त्यांच्यामध्ये ‘तंटा’ होणारच ! हा मनोग्रह धरून आपण वाढतो. त्यामुळे भांडणाची प्रवृत्ती आपल्याला समाजातूनच देणगी स्वरुपात मिळाली आहे.
परंतू पति पत्नीचं “भांडण” हा इतक्या विकोपाला जाऊ शकतो कि, पतिला चक्क जीव गमवावा लागेल असा विचार सुद्धा दगडू पुंडलिक सुरवाडे यांनी केलं नव्हता.
घटना आहे बोदवड तालुक्यातील पांचदेवळी येथील बौद्धवाडा परिसरातील सदर खळबळजनक घटनाने संपूर्ण परिसर हादरले आहे.
मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पाचदेवळी येथील दगडू पुंडलिक सुरवाडे वय ४८ हे परिवारा सह राहत होते . सदर व्यक्ती दारुच्या व्यसनाधीन असून त्यांची पत्नी आशाबाई सुरवाडे यांच्यावरील वारंवार चारीत्र्यांचा संशय घेत होता . दिनांक ११ डिसेंबर रोजी शेतातून सायंकाळी घरी आल्यानंतर दगडू सुरवाडे याने दारूच्या नशेत असताना पत्नीशी भांडण करून तिला शिवीगाळ करत होता.रात्री ८:३० वाजेच्या सुमारास सुरवाडे यांच्या मुली व मुलगा बाहेर काकूच्या घराजवळ बसले होते . यावेळी आशाबाईने तिचे पती दगडू सुरवाडे खाटेवर झोपलेला असतांना त्याच्या डोक्यावर विळ्याने वार करून ठार केल्याची घटना घडली आहे . मुलगी रोशनी घरी आल्यावर तिने वडील रक्ताच्या थारोळयात पडलेले व आई च्या हातात विळा असल्याचे बघीतले होते. याबाबत मयताची मुलगी रोशनी दगडू सुरवाडे वय १७ राहणार बौद्धवाडा, पाचदेवळी हिने वरणगांव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून वरणगांव पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान ३०२ प्रमाणे आशाबाई सुरवाडे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास ए पीआय आशिष अडसुळ व पीएसआय परशुराम दळवी करीत आहेत .
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.