जळगांव शहर महानगरपालिका पाईप चोरी प्रकरणात दोषींविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा करणार प्रजाशक्ती क्रांती दल आंदोलन – राष्ट्रीय सचीव ऍडव्होकेट सतीश मोरे

जळगांव (शहर प्रतिनिधी) : जळगांव शहर महानगरपालिकेतील पाईप चोरी प्रकरणात राजकीय व्यक्ती सोबत प्रशासनातील अधिकारी हि सामील असून दोषी अधिकारी यांना सेवेतून तात्काळ निलंबित करून दोषींविरुद्ध खटले भरण्यात यावे.
असे प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय सचीव ऍडव्होकेट सतीश मोरे यांनी आज सोशल मीडियाच्या माद्यमातून सांगितले सविस्तर वृत्त असे कि प्रजाशक्ती क्रांती दलाचे जिल्हा सह संघटक अमित तडवी यांनी महापालिकाले पाईप प्रकरणाविषय दिनांक ४/१०/२०२४ रोजी अर्ज दिला होता.
त्या अनुषंगाने महानगरपालिकेतील अधिकारी यांनी त्या विषयावर पाहिजे त्या गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही केली नाही त्यानंतर दिनांक ०६/१२/२०२४ रोजी स्मरणपत्र देऊन देखील त्यांनी सदर समरणपत्राची गांभीर्याने दखल घेतली नाही प्रथमदर्शनी सदर पाईप प्रकरणात राजकीय व्यक्ती सोबत महापालिकेतील अधिकारी पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे दिसते जर प्रशासकीय स्तरावरून लवकरात लवकर दोषींवर कार्यवाही न झाल्यास प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने लवकरच आंदोलन छळण्यात येईल असे प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय सचीव ऍडव्होकेट सतीश मोरे यांनी सोशल मीडियाच्या माद्यमातून कळविले.