शिवसेनेचे खासदार संजय राऊत बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला होता.
नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला होता. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर विधान भवन परिसरात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश असल्याचा इशारा दिला.
मला वाटते आधी तात्काळ सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. मी तुम्हाला एक पेन ड्राइव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आले की पेन ड्राइव्ह यायला लागतात, अशी एक पद्धत झाली आहे. या पेन ड्राइव्हमध्ये ७०च्या दशकात महाराष्ट्र सरकारनेच केलेली ‘केस फॉर जस्टीस’ ही फिल्म दिली आहे. ती फिल्म मी मुद्दामहून आणली आहे. त्या फिल्मचा उद्देश स्पष्ट आहे.
https://youtu.be/O7sW3u4HRGY. साधारणत: १८व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरली जाते हे दाखवले आहे. त्यात जुन्या मराठी पाटय़ा, प्रशासकीय कामकाजाची मराठीतील कागदपत्रे आहेत. शाळा मराठी होत्या, महिला मंडळ आणि इतर संस्थाही मराठी होत्या हेही त्यात दाखवले आहे. हे सगळे पुरावे त्यात आहेत.