महापालिकेतील पाईप चोरीतील मुख्य सूत्रधार महापालिकेचे अधिकारी – ॲड. सतीश मोरे

जळगांव प्रतिनिधी : महापालिकेत जी पाईप चोरी ला सुरवात झाली तेव्हाच आमच्या संघटनेचे जिल्हा सहसंघटक अमित तडवी यांनी महापालिका आयुक्त यांच्या निर्दशनास आणून दिले परंतु आयुक्तांनी घटनास्थळी कोणाला पाठवण्याची तसदी न घेता तक्रार द्या पुरावे असतील तर पुरावे द्या अशा पद्धतीने उलट प्रश्न केलेत त्यानंतर लागलीच अमित तडवी यांनी पुराव्या सह आयुक्तांकडे कडे तक्रार अर्ज दिला
व अभियंते योगेश बोरोले यांची भेट घेऊन तक्रार अर्जा संदर्भात चर्चा केली परंतु त्या तक्रार अर्जावर साधारण महिनाभराने कार्यवाही झाली हे विशेष व दरम्यान करोडो रुप्याच्या पाइपांची व इतर वस्तूंची चोरी त्या ठिकाणी झाली याचा अर्थ महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानी हि चोरी झाल्याचे महापालिका आयुक्त यांना निवेदन दिल्यानंतर प्रजाशक्ती क्रांती दलाचे राज्य सचिव ॲड. सतीश मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच निवेदन देताना फोटो सुद्धा काढण्यास महापालिका आयुक्तांनी मनाई केल्याचे हि ते यावेळेस बोलले जर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास मुख्य मंत्र्यांकडे कार्यकर्त्यांसह आंदोलन करू असेही ते यावेळी बोलले.