केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन.
भुसावळ:अखिलेशकुमार धिमान
दिनांक:०६ डिसेंम्बर २०२२
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दोन विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि रक्षण या बाबी देखील अत्यंत जिकरीच्या आहेत. त्याविषयी सर्व शिक्षक, पालक व तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने शाळांमध्ये सुरक्षा व रक्षण या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. श्री एस. डी. धिवरे, प्रभारी अग्निशमन दल ऑर्डरस फॅक्टरी भुसावल यांनी कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन केले. कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करावे याविषयी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यालयांमध्ये लैंगिक खेळापासून महिलांचे संरक्षण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शहरातील सुप्रसिद्ध एडवोकेट भंडारी मॅडम यांनी यावेळी या कायद्यातील तरतुदीची माहिती करून दिली. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये यासाठी महिला तक्रार निवारण समित्यांची स्थापना व्हायला हवी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य नितीन कुमार उपाध्याय यांनी स्वागतोत्तर भाषण दिले. कार्यक्रमाचे संचालन संदेश निनावे पीजीटी इंग्रजी व सीमा बाथम पीजीटी इंग्रजी यांनी केले. मुख्याध्यापक सुरेश नरहिरे यांनी आभार प्रदर्शन केले
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.