महाराष्ट्रराजकीय
अक्षय काळे यांना शिवसेना पक्षाकडून गटनेतेपद
सोयगांव (विवेक महाजन) नगर पंचायत, सोयगांव येथील झालेल्या निवडणुकीत सन २०२१/२२ मधील गटनेता हे पद अक्षय विनायक काळे यांना शिवसेना पक्षा कडून देण्यात आले. त्यामुळे शिवसेना पक्षात व गांवातील मतदारामध्ये आनंदी वातावरण व पेढे वाटुन आनंद व्यक्त केले व आतिश बाझी केली.
त्यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष प्रभाकर (आबा साहेब) काळे, शहर प्रमुख व नगर सेवक संतोष बोडखे, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, राजु दुत्तोंडे, शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व शिवसेना कार्यकर्ते व गांवकरी, मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या.