मेळघाटातील रस्त्यात जीव घेणारे खड्डे ; लोकांचा आरोप
मेळघाटातील धारणी तालुक्यात परतवाडा जाणारा मार्ग निकृष्ट दर्जाचे
धारणी (इंद्रकुमार राजनकर) धारणी तालुक्यातील आदिवासी भागात अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या रस्त्याची दूर व्यवस्था झाली आहे. लावादा, चित्री, बोरी, कोठा, जांबु, कोट, सोसोखेडा, नांदुरी, कारा इत्यादी अनेक क्षेत्रात रस्ता बरोबर नाही. अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
गावांची रोड हरिसाल गावात येतात. हरिसाल ते परतवाडा किंवा अमरावती जाणारा हे एक मात्र रस्ता आहे. तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याच्या आरोप ग्रामस्थ करत आहे. या रस्त्यावर कुठेतरी जीव घेणारे खड्डे पडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. आतापर्यंत येथील अपघातात अनेकांनी जीव गमवावा लागला आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून ठेवले आहे का? असा प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित होतोय.