महाराष्ट्र
धारणी-तहसील अंतर्गत मांडवा गावात विविध ठिकाणी विकासकामांचा शुभारंभ
धारणी (प्रतिनिधी) जि.प.सदस्या माया मालवीय, सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विकास कार्य त्याअंतर्गत दोन ठिकाणी पक्क्या नाल्यांचे उद्घाटन तर दोन ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. तसेच सर्व शाळा दुरुस्ती व जि.प कामे मंजूर करण्यात आली.
बासपाणी गावात रस्ते काँक्रिटीकरण, वॉल कंपाऊंड, शाळा दुरुस्ती, नवीन पाण्याची पाईपलाईन, नवीन विहीर व विद्युत खांब वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी बासपाणी ते मांडवा व धारणी ते मांडवा या रस्त्याचे 25 लाखांच्या निधीतून डांबरीकरणासह अनेक विकासकामे जि.प.सदस्या माया मालवीय यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाली आहेत.



