महाराष्ट्रराजकीय
वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांचा शिवसेनेत प्रवेश
वंचीत बहुजन आघाडीला बुलढाण्यात खिंडार
मोताळा (मिलींद बोदडे) वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रिकांत जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बुलढाणा तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीला खिंडार वंचीत बहुजन आघाडी ही स्वाभिमानी चळवळ असुन अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहे. कोसो दुर असलेल्या लोकांना सत्तेत आणायच काम वंचीत बहुजन आघाडीचे सर्व सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केल. त्यातच या पक्षात येवुन ज्यांना कुणी ओळखत नाही. त्यांना मोठ करण्याच काम वंचीत बहुजन आघाडीने केल आहे. त्यातच बुलठाणा तालुका अध्यक्ष यांनी वंचीत बहुजन आघाडी सोडुन शिवसेना संवाद मेळाव्यात आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थीत प्रवेश करुन वंचीत बहुजन आघाडीत खिंडार पाडले आहे.