महाराष्ट्र

‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा मृत्यू, वन्यप्रेमी हळहळले !

कॉलरवाली’ वाघीणीने ११ वर्षांत २९ बछड्यांना दिला जन्म

नागपूर (प्रतिनिधी) नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात टी-१५ तसेच ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघीणाचा वार्धक्यामुळे मृत्यू झाला आहे. ‘कॉलरवाली’ वाघीणीने ११ वर्षांत २९ बछड्यांना जन्म दिला होता.

शनिवारी संध्याकाळी जंगलात अधिकाऱ्यांना ती मृतावस्थेत आढळली. २००८ ते २०१९ या ११ वर्षांच्या काळात तिने तब्बल २९ बछड्यांना जन्म दिला. टी 15 तसेच पेंचची राणी या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या वाघिणीचा वयाच्या १७ व्या वर्षी मृत्यू झाला. तसे तर ती वृद्धावस्थेत पोहोचली होती, मात्र एका सवयीमुळे तिचे आरोग्य बिघडले आणि शनिवारी तिचा मृत्यू झाला, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कॉलरवाली हे नाव का पडलं?

पेंच अभयारण्यातील या वाघिणीला २००८ साली देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडिओ कॉलर लावला होता. त्यामुळे ती जंगलात तिला कॉलरवाली वाघीण म्हणूनच ओळखले जात होते. सध्या याच क्षेत्रात पाटदेवची T-4 ही वाघीण तिची मुलगी असून तीदेखील लोकप्रिय आहे.

मध्य प्रदेशचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुब्रमण्यम सेन यांनी सांगितले की, २००५ मध्ये या वाघिणीचा जन्म झाला होता. त्यानंतर तिची आई t-7 हिचे निधन झाले होते. २००८ ते २००९ या काळात t-15 वाघीण ८ वेळा गरोदर राहिली. तिने २९ बछड्यांना जन्म दिला. या वन परिक्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्यात तिची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे जंगलात ती सुपर मॉम या नावानेही ओळखली जात होती.

वृद्धावस्था आणि एका सवयीमुळे मृत्यू

कॉलरवाली विघाणीचे १४ जानेवारी रोजी अखेरचे दर्शन झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाघीण वार्धक्यामुळे क्षीण झाली होती. तसेच दोन-तीन दिवस जंगलात तिची हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे पथकाने तिचा शोध सुरु केला. त्यानंतर ती घटनास्थळावर मृत अवस्थेत आढळली. दरम्यान, स्वतःचे शरीर चाटण्याच्या सवयीमुळे तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला. आतड्यांत हा केसांचा गोळा फसल्याने तिचे निधन झाले असावे, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे