गुन्हेगारीमहाराष्ट्र
भरधाव वाहनाची आँटोला धडक ; शेलापुर येथील घटना एक ठार
बुलाढाणा (मिलींद बोदडे) भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत आँटोतील एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घडना २१ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
भरधाव वेगातील एमपी_६८ सी २६७० या क्रमांकाच्या मारुती सुझुकी बुलढाण्या वरुन मलकापुर येत असतांना शेलापुर हुन बुलढाणा रस्त्याकडे जात असलेल्या एम एच २० एटी २५८० क्रमांकाच्या आँटोला जोरदार धडक दिली. या धडकेत सतीष रमेश नंदाने (वय ३७) व अनंता किसन पांडे (वय ४०) हे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले दरम्यान ग्रामस्थाच्या मदतीने जखमीना उपजिल्हा रुग्णालय मलकापुर येथे हलविण्यात आले असता वैद्यकिय अधिकारी यांनी तपासनी करुन सतीष रमेश नदांने यांना मृत घोषीत केले तर अनंता पांडे गंभीर रित्या जखमी असुन उपजिल्हा रुग्णालय मलकापुर येथे उपचार सुरु आहे.