शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल चा नारळ वाढवून प्रचारास सुरुवात
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 12 जूनला मतदान होणार आहे, यासाठी शहरातील माजी नगराध्यक्ष दीपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल ची स्थापना झाली असून त्या माध्यमातून आज माळीवाडा येथील मारुती मंदिरात शेतकरी विकास पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी सह नारळ वाढवुन प्रचारास शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शेतकरी विकास पॅनलचे ज्येष्ठ माजी सरपंच काशिनाथ कृष्णा भदाणे, डॉ.विश्वासराव भामरे,चंद्रसिंग परदेशी, संजय गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख माजी नगराध्यक्ष दीपक दादा देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, अशोक बोरसे, किरण थोरात, दिनेश माळी तसेच पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, निलेश देसले, शिवसेनेचे समन्वयक विनायक पवार ,चेतन देसले मेहमु खा पठाण, शेख ,समद शेख कैलास वाघ आदी सह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून 13 जागांवर तेरा उमेदवार उभे केले असून सर्वसाधारण गटासाठी पठाण विपणखा गभीर खा कबीर खान, पाटील दिलीप आधार, पाटील प्रकाश गुलाबराव, पाटील प्रकाश नथू ,पाटील मनीष कालिदास, मराठे भूषण दिलीप ,माळी मनोज दसरथ ,माळी वेडु दोधा तसेच अनुसूचित अनुसूचित जाती जमाती साठी कसबे राजधर मोतिराम, इतर मागास वर्ग साठी, देसले सचिन चंद्रकांत, भटक्या व विमुक्त जमाती साठी भोई हिरालाल गोविंदा, महिला प्रतिनिधी चौधरी चिंधाबाई पोपट, चौधरी मंजुळा श्रीराम हे रिंगणात असून त्यांची निशाणी कपबशी आहे. न्यू पॅनल शेतकरी हिताच्या व विकासासाठी देण्यात आले असून तत्पूर्वी विरोधी पक्षाचे इतर मागास प्रवर्ग जागेवर बागवान इलियास बशीर यांनी माघार घेत शेतकरी विकास पॅनल जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले असून शेतकरी विकास पॅनल हे हया जागेवर जवळपास निवडण्याचे निश्चित मानले जात आहे. या पॅनल ला सर्वच्या सर्व जागांवर विजय करण्याचे आव्हान शेतकरी विकास पॅनलचे पॅनल प्रमुख दीपक दादा देसले यांनी मतदारांना केले आहे.