अमळनेर

अखेर दहिवद फाटा ते दहिवद रस्त्याचा सुटला प्रश्न

४० लाख निधीतून होणार रस्ता ; आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना आमदार अनिल पाटलांनी एस.आर प्रोग्रॅम अंतर्गत या रस्त्यासाठी ४० लाख निधी मंजूर केल्याने अतिशय थाटात या रस्त्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.

दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असताना गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने येथून जाताना ग्रामस्थांची कसरत होत होती. यामुळे आमदारांनी हा प्रश्न मनावर घेऊन निधी मंजूर करून आणल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आ.अनिल पाटलांच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच सुषमा देसले ग्रामस्थांनी नवीन पाणीपुरवठा व रस्ता काँक्रीटीकरनाची मागणी केली, तर धनगर समाजाने स्मारकाची मागणी केली. ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही आमदारांनी दिली.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील,प स चे माजी उपसभापती सुभाष देसले, माजी जि प सदस्य अशोक पाटील, जयवंत गुलाबराव पाटील, मार्केटचे प्रशासक सदस्य एल टी पाटील, उपसरपंच बाळू आत्माराम पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, ग्रा प सदस्य शिवाजी पारधी, वर्षा पाटील, रेखाबाई पाटील, रवींद्र माळी, दत्तात्रय देसले, गोकुळ माळी, किशोर पाटील, सुकलाल पारधी, बापू सोनवणे, भिला नाना, संजय देसले, ईसवर माळी, भुषण भदाणे, गुलाब पाटील, बापू पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गुलाब, दिलिप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भानुदास लोहार, दिलीप माळी, भाऊराव पाटील, स्वप्निल पाटील, नरसिंह देसले, सुधाकर पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पारधी, भिकन सोनवणे, राहुल माळी, बाळू सोनार, नाना पाटील, पंडित पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे