शिरपूर शहरातील वाल्मिक नगर परिसरात राष्ट्रवादीचे नेते डॉ जितेंद्र ठाकुर यांच्या हस्ते ई श्रम कार्डचे मोफत वितरण
शिरपूर (प्रतिनिधी) शहरातील वाल्मिक नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शहर चिटणीस हिरा कोळी यांच्या प्रयत्नातून परिसरातील गोरगरीब नागरिक व महिला भगिनींचे ई श्रम कार्ड मोफत बनवुन देण्यात आले.
सदरकामी ई सेवा केंद्र चालक गोपालभाऊ कोळी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच परिसरातील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते दादासो,आबा कोळी, मोहन मंडाले,हिराभाऊ कोळी, नाना कोळी, रवि कोळी यांनी मोलाचे योगदान दिले. तरी सदरील इ श्रम कार्डचे मोफत वितरण शिरपूर तालुक्याचे स्वाभिमानी नेते डॉ जितेंद्र ठाकुर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी इ श्रम कार्डचा उपयोग कसा होईल याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच हिराभाऊ कोळी यांनी परिसरातील नागरिकांसाठी आतापर्यंत आरोग्य शिबिरे, मोफत गॅस वाटप, आणि आता ई श्रम कार्ड चे वाटप असे विविध लोकोपोगी कार्यक्रम घेतल्यामुळे हिराभाऊ कोळी यांच्या सारख्या समाज कार्याचा हेवा इतरांनी देखील करण्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगून यापुढे देखील असेच लोकोपयोगी कामांना पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ जितेंद्र ठाकूर यांनी यावेळी दिले.
यावेळी उद्योगव्यापारचे प्रदेश सरचिणीस दिनेशदादा मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिरीषदादा पाटील, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी उपजिल्हाधयक्ष निलेश गरुड, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष आशिषभाऊ अहिरे, डॉ. राहुल साळुंखे, करीम शेख, गुड्डू पठाण, श्यामभाऊ चांदे, गौतम भाऊ, शामभाऊ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादासो आबा कोळी, मोहनदादा मंडाले, हिराभाऊ कोळी, नाना कोळी, प्रताप कोळी, सागर कोळी, भटु कोळी, राहुल कोळी, जवाहरलाल कोळी, संतोष कोळी, गोपाल कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राहुल साळुंखे यांनी केले तर आभारप्रदर्शन हिराभाऊ कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर शहर चिटणीस हिराभाऊ कोळी यांनी केले होते.