महाराष्ट्र
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
मोहोळ (श्रीराम सोलंकर) काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे द्राक्ष बागेचे व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गोष्टींचा शासन स्तरावर विचार करण्यात यावा व लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्याला दयावी. प्रशासनाला कधी जाग येत तेच पाहवे लागणार आहे.