जळगाव जिल्हाराजकीय
भाजपची उद्या महत्वपूर्ण जिल्हा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण जिल्हा बैठक उद्या दि.१८ फेब्रुवारी २०२२, शुक्रवार रोजी दुपारी ०१.०० वाजता जी. एम. फाउंडेशन, शिवतीर्थ मैदान समोर, जळगाव येथे मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाअध्यक्ष आ.सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या बैठकीला प्रदेश पदाधिकारी, आमदार-खासदार, जिल्हा पदाधिकारी, कायम निमंत्रित, विशेष निमंत्रित, जिल्हा आघाडी/प्रकोष्ठ/मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस, मंडल अध्यक्ष/सरचिटणीस, जि.प./प. स. सभापती व सदस्य, नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक या सर्व अपेक्षित पदाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे व हर्षल पाटील यांनी केले आहे.