बोदवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयाचे अंदाजपत्रक असलेले रस्त्यांची कामे सुरू आहे. सुरवाडा मुक्तळ पळासखेडे तसेच बोदवड ते घाणखेड या रस्त्याचे काम सुरू असून हे काम म्हणजे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना होय.
बोदवड सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अंतर्गत ३१ डिसेंबर रोजी मुक्तळ वीज उपकेंद्र पासून ते रुंदीकरण झालेल्या कामापर्यंत डांबरीकरणाचे काम सुरू असून ये -जा करणाऱ्या वाहनधारकांची प्रतिक्रिया घेतली असता कामावर बालमजूर असल्याचेही काही नागरिकाकडून बोलले जात आहे. या रस्त्यावर सुरुवातीला रस्त्याच्या डांबरी पृष्ठ भागावर डांबर चाकोट मारला पाहिजे होता. रस्त्याच्या कडा मजबूत न करता पोटहोल न भरता काम सुरू केले आहे. खडी पसरवणे अगोदर अत्यंत कमी प्रमाणात डांबर वापरले जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील खडी चार दिवसात खडायला सुरुवात झाली आहे.
जागोजागी रस्त्याच्या कडा तुटले आहे असून खडी पसरलेली दिसत आहे. एणगाव ते घाणखेड यादरम्यान सिमेंट रस्ता बनवला आहे तो पण निकृष्ट दर्जाचा बनवला गेला असून काही रस्ता बनवणे चालू आहे. अल्पावधीतच रस्त्याचे बारा वाजलेले दिसत आहे. काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागचे कर्मचारी साईटवर हजर पाहिजे परंतु कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यामुळे त्यामुळे ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचे काम करण्यास संधी मिळते. कर्मचाऱ्यांची मात्र सकाळी नऊ वाजेपासून ते संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत कागदोपत्री फिरस्ती दाखवली जाते. प्रत्यक्षात कार्यालयात गेले असता सहा वाजता कार्यालय दिसून येते. या ठिकाणी फक्त चौकीदार दिसून येतो यामुळे शासनाचा निधी वाया जातो, अशी तक्रार भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी केली आहे.