शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेस प्रारंभ
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक सन २०२२-२०२७ साठी निवडणुकीचा बिगुल वाजला असुन नऊ मे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर १२ जुन २२ रोजी मतदान होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.दशपुते यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा शहरातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना २५ मे १९१८ रोजी झालेली आहे. त्यात पहिला चेअरमन पदाचा मान अविवाहित आनंदकुमार बाजीराव पाटील यांना मिळाला होता. त्यानंतर रमेश चिंतामण भामरे, युवराज नामदेव माळी, चंद्रशेखर जगन्नाथ चौधरी, तर विद्यमान चेअरमन गोकुळ शिवराम माळी आणि व्हाय चेअरमन प्रभाकर जयराम मराठे हे संचालक मंडळ धुरा सांभाळत आहेत. एकुण ११०८ सभासद नोंदणी असुन त्यापैकी ७८२ कर्जदार सभासद निवडणूक प्रक्रिया साठी पात्र ठरले आहेत.
सदर सोसायटीच्या सन २०२२ ते २०२७ हया पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल दि.९ मे २२ ते १३ मे २२ हया कालावधीत सकाळी ११ ते ३ हया वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा केले जातील.तसेच छाननी १७ मे २२ दुपारी १२ वाजेपासून होणार आहे. विधीग्राहय नामनिर्देशन पत्राची १८ मे २२ रोजी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन पत्राची माघार घेण्यासाठी १८ मे २२ ते ०१ मे २२ सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. अंतिम यादी ०२ मे २२ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. मतदान दिनांक १२ मे २२ सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत केले जाणार आहे.तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजेपासून मतमोजणी होणार आहे.
त्यानंतर अंतिम निकालाची यादी जाहीर केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.दशपुते यांनी दिली असून ह्यासाठी सचिव धनराज तुकाराम शिरसाठ तर शिपाई अमोल भगवान शिंपी हे परिश्रम घेत आहेत.एकंदरीत ही निवडणूक चुरशीची होणार असली तरी राजकीय पक्षांचे वरीष्ठ नेते सक्रिय होणार की स्थानिकांना अधिकार देतील अशी चर्चा रंगली आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपा विरोधात महाविकास आघाडी असा सामना असला तरी हया निवडणूकीत कितपत हयाचा उपयोग करून घेतला जातो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल एवढे मात्र निश्चित.