बोदगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
बोदगाव (प्रतिनिधी) ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प शाळा चिंचपाडा बोदगाव येथे ध्वजारोहण पंचायत समिती सदस्य संगीता गणेश गावित, सरपंच/पो पाटिल, कृषी सहाय्यक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
ध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली व आदिवासी बचावचे त्याप्रसंगी २०२२ चे कॅलेंडर प्रसिद्ध केले. मान्यवरांच्या हस्ते, पंचायत समिती सदस्य संगीता गणेश गावित व महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख गणेश बळवंत गावित, पो पाटिल बन्सिलाल गायकवाड, सरपंच देविदास गावित, गोविंदा बहिरम, आदिवासी अभियान शाखाप्रमुख चिंचपाडा भरत ठाकरे, भिमराव गावित, प्रशांत बागुल, जि प शाळा मुख्याध्यापिका सिंधू अहिरे व आर एम ठाकरे, बोदगाव जि प शाळेचे मुख्याध्यापक बहिरम व शिक्षक आरोग्य सेविका गवळी, ग्रा पं सदस्य, ग्रा पं कर्मचारी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.