बोदवड नगरपंचायतमध्ये गटनेतेपदावर नवनिर्वाचित नगरसेवक आनंदा पाटील यांची निवड
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या गट नोंदणीचा प्रस्ताव आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. गटनेते पदावर नवनिर्वाचित नगरसेवक आनंदा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी हाजी सईद भाई बागवान, बेबीताई माळी, बेबीताई चव्हाण, मनिषा ताई बडगुजर, मीराताई माळी, रेखा ताई गायकवाड, पूजाताई जैन, शारदाताई बोरसे हे उपस्थित होते. ज्येष्ठ नगरसेवक आनंदा पाटील यांची शिवसेना पक्षाचे गटनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी आनंदराव देशमुख, सहाय्यक परविन चौधरी, तुषार बोरसे, देवेंद्र खेवलकर, शांताराम कोळी, पियुष मोरे, संदीप वानखेडे, दिनेश माळी, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, निलेश माळी, प्रितेश जैन, कलीम शेख, गोपाल पाटील, गणेश भोई, आमीन मणियार, शरीफ मनियार, जमील बागवान, मनोज पाटील, मोहसिन बागवान, राजू काळे हे उपस्थित होते.
बोदवड शहराच्या सर्वांगीण व साक्षात विकास करण्यासाठी भाऊचे सर्व प्रयत्न कायम सुरू आहे. शहराचे रूप बदलून टाकण्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करुन नियोजन बद्ध कामे केली जाणार आहेत. अशी प्रतिक्रिया हाजी सहिद बागवान यांनी दिली आहे.