शिवसेनेच्या पदाधिकारीच्या दमदार कार्याला दमदार भगवा सलाम !
धुळे (प्रतिनिधी) शेवटी एकच म्हणावेसे वाटते की सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यांत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकारुन दिलेल्या ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणेनुसार धुळ्यातील जाॕबाज शिवसेनेचे पदाधिकारी त्यात दबंग महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी ज्या दिवसापासून शिवसेनेत प्रवेश केला. त्यादिवसापासून धुळे महानगरातील गोर गरीब जनतेची कशा पध्दतीने पिळवणुक केली जात आहे.
याचे एक एक किस्से बाहेर काढून समोरच्याना सळो की पळो करुन टाकले लोकांना वाटायचे की मनोज मोरे यांना शिवसेना उमजणार जमणार नाही त्यात ते जास्त दिवस रमणार नाहीत काही दिवसात पुन्हा स्वघरी म्हणजेच राष्ट्रवादीत जातील असा समज झालेला होता. मात्र, मनोज मोरे यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी समवेत जी काही घोटाळे उघड करण्यास सुरुवात केली. मग धुळे महानगर वासियांच्या मनात जो भ्रम निर्माण झाला होता तो दूर झाला कारण आता मनोज मोरे शिवसेनेत रममाण झाले. शिवसेना त्यांच्या नसा नसात भिनल्यांचे दिसून येते. कोणाला काही वाटू द्या मनोज यांनी जी काही घोटाळे उघड केली. त्याबाबत त्यांचे शहरासह ग्रामीण भागात सुध्दा प्रशंसा करण्यांत येत आहे.
मनोज मोरे यांना शिवसेनेचे इतर पदाधिकारीकडून सुध्दा मनापासून मदतीचा हात मिळत असतो. त्यात नुतन जिल्हाप्रमुख डाॕ. तुळशिवराम गावीत, उपजिल्हाप्रमुख किरणभाऊ जोंधळे, सहसंपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी, महेशभाऊ मिस्त्री, महानगर प्रमुख सतिष तात्या महाले, प्रफुल्ल पाटील, माजी नगरसेवक धडाडीचे शिवसेना पदाधिकारी संजयभाऊ वाल्हे, गुलाबभाऊ माळी, डाॕ. सुशिल महाजन, समन्वयक धिरजभाऊ पाटील, संदिप सुर्यवंशी, संदिप चव्हाण, ललितभाऊ माळी, राजेश पटवारी, विनोद जगताप, डिंगबर चौधरी याच्यासह सर्वच प्रमुख शिवसेना पदाधिकारी मोठ्या जोमाने शिवसेनेच्या हिताच्या कार्यात जातीने झोकून देत असल्यांचे दिसून येते. याचा मनाला आंनदच वाटतो यातून लोकांना वाटणारी कमकुवत शिवसेनेमध्ये जोम आल्यांचे लोक म्हणु लागले आहेत. असो सदर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या दमदार कार्याला माझ्या कडून दमदार भगवा सलाम
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि कार्यमग्न मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साजेसे कार्य धुळे शिवसेनेच्या वतीने सुरु झाल्यांचे दिसते. त्यातूनच दोन शब्द लिहिण्यांचा मोह झाला आणि दमदार कार्याबद्दल तोडके मोडके शब्द लिहिले माझ्या लिखाणात काही चुकीचे झाले असेल तर माफी असावी.
शब्दांकन – धुळे जिल्हा प्रतिनिधी