शिंदखेडा येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तुकाराम बिज साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शहरातील शिवाजी चौकात शिवजयंती उत्सव समितीतर्फे जगदगुरु संत तुकाराम महाराज बिजनिमित्त संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, नगरसेवक उदय देसले, अरुण देसले, शरद पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, गणेश मराठे, प्रशांत देसले, राणा, देसले, रऊफ बागवान, निलेश परदेशी, पंकज कौठळकर, चेतन देसले, नरेद्र देसले आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित काही मुद्दे व महाराष्ट्र ला लाभलेल्या प्रसंगाचा आधार घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्तविक व सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी केले. सदर कार्यक्रम शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केला होता. पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



