धुलिवंदनाचा सण उत्साहात परंतु शांततेत साजरा करावा ; भुसावळ उप विभागातील नागरिकांना आवाहन
भुसावळ (अखिलेश धिमान) दि.१८ मार्च रोजी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर तसेच भुसावळ उपविभागा मध्ये पोलीस विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नाका-बंदी दरम्यान ड्रंक एण्ड ड्राईव्ह, विना सायलेन्सर असणाऱ्या गाड्या, विनाकारण रोडवर फिरणारे तरुणांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाया करण्यात येणार आहे.
त्याशिवाय शहरांमध्ये सर्वच धार्मिक स्थळी फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहे तसेच मोकळी मैदाने, बस स्टॅन्ड, बाजारपेठा याठिकाणी पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की उद्याचा धुलिवंदनाचा सण उत्साहात परंतु शांततेत साजरा करावा. उत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही व शांततेस गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन भुसावळ उपविभाग डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे कडून प्रसिद्धि मूध्यमातून करण्यात आले आहे.