महाराष्ट्र
पान दुकान चालकाची मोटरसायकल लंपास
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे रात्रीच्या सुमारास पान दुकानासमोर लावलेली मोटरसायकल नजर हटताच चोरीला गेल्याची घटना घडली.
याबाबत तक्रारदार किरण राजेंद्र महाजन यांनी दिलेली माहिती अशी की, काल दि. ३ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी रात्री नेहमीप्रमाणे शिवाजी महाराज पुतळ्यामागे असलेल्या आपल्या पायल पान काँर्नर या दुकानापुढे हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८-बी.जे.-१०८१ ही काळ्या-सिल्व्हर रंगाच्या पट्टा असलेली गाडी उभी होती. मात्र माझी जशी नजर हटली, तशी क्षणात माझ्या नजरेसमोरून मोटरसायकल कोणी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. मी तीचा इतरत्र शोध घेतला तरी मिळून आली नाही. म्हणून मी आज दोंडाईचा पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरी झाल्याची खबर दिली आहे.