
जळगांव प्रतिनिधी : जळगांव शहरातील सर्वाधिक शासकीय कर भरणारे नागरिक हे मेहरूण शिवारातील हद्दीत राहतात मात्र याच नागरिकांना मेहरूण तलाठी कार्यालयात शासकीय कामे पडल्यास विद्यमान तलाठी हे जेष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांना विनाकारण फिरवाफिरवी करीत असल्याने सर्व सामान्य नागरिकात बोलले जात असून यामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे तरी वरिष्ठानी याची तात्काळ दखल घेऊन समधीत तलाठी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
महसूल विभागातील शासकीय कामे करण्याची जबाबदारी तलाठी यांच्या खांद्यावर असते मात्र बहुतांश ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले घेताना बऱ्याच ठिकाणी तलाठ्यांचे दाखले लागतात मात्र अशा वेळी तलाठी हे कार्ययल्यात वेळेत उपस्थित नसतात असलयास विनाकारण नागरिकांची फिरवणूक करतात. अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार नागरीकातून येत असतात. अशाच प्रकारचा अनुभव मेहरूण तलाठी कार्यलयात नागरिकांना अनुभवायास मिळतो आहे. त्यात सात बाऱ्याचे,नाव दुरुस्ती आदेश,क्षेत्र दुरुस्ती,वारसाचे प्रकरण,आदी विषयांवर नागरिकांना काम पडल्यास समधीत तलाठी हे विनाकारण नागरिकांना कार्यलयाच्या पायऱ्या शिजवायस भाग पाडत आहे. तरी वरिष्टानी ह्या मनमानी कारभार करणारे तलाठी यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.