महाराष्ट्रराजकीय
सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
सिल्लोड (विवेक महाजन) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शकुंतलाबाई बन्सोड, आसिफ बागवान, जितू आरके, बबलू पठाण, संतोष धाडगे, जगन्नाथ कुदळ, फहिम पठाण, माजी नगरसेवक सुशील गोसावी, साहेबराव गोराडे, सुनील सोनवणे आदींची उपस्थिती होती.