वैजापूर येथे होणार डोणगाव येथील गोदावरी पूर घोटाळा संदर्भात बैठक

वैजापूर : दि. २६ एप्रिल २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर येथे डोणगाव येथील गोदावरी पूर घोटाळा संदर्भात बैठक होणार आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये गोदावरी नदीच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची अफरातफर करुन शासकीय रक्कमेच्या अपहाराबाबतची चौकशी करण्याबाबत तक्रारदार प्रकाश सा. डोखे यांनी लोकआयुक्त यांच्याकडे केलेली तक्रार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे पत्र जा.क्रं. 2020/मशाका- 1/आस्था-2/तक्रार/प्र.क्रं. कावि 66 दि.04 मार्च 2022 या कार्यालयाचे समक्रमांकी पत्र दिनांक 04 मार्च 2022 व 24 मार्च 2022 प्रकाश सा. डोखे यांनी मा.उप लोक आयुक्त यांचेकडे माहे ऑगस्ट 2019 मध्ये गोदावरी नदीच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनामाची अफरातफर करुन शासकीय रकमेच्या अपहाराबाबतची चौकशी करण्याबाबतची तक्रार केली.
सदरील तक्रारीच्या अनुषंगाने विधासभा व विधानपरिषद प्रश्नांप्रमाणे कार्यवाही करुन सविस्तर वस्तुस्थितीचा अहवाल उप लोकआयुक्त यांचेकडे दिनांक 14 मार्च 2022 पूर्वी सादर करणे बाबत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना कळविलेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी उक्त प्रकरणात दिनांक 10 मार्च 2022 पर्यत सविस्तर वस्तुस्थितीचा चौकशी अहवाल दिनांक 09 मार्च 2022 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अदयाप पर्यंत आपला अहवाल या कार्यालयास अप्राप्त आहे. सदरील प्रकरण मा. लोकआयुक्त संदर्भ असुनही आपण त्यामध्ये विलंब करीत आहात, जी बाब अत्यंत खेदजनक आहे.
याकरीता उक्त प्रकरणाच्या अनुषंगाने व विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे कार्यालयाकडील पत्रव्यवहारा नुसार करावयाची कार्यवाही व केलेली कार्यवाही याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय वैजापूर येथे संध्याकाळी 4.00 वाजता बैठक ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सदर बैठकीसाठी आपण व वरील विषयाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी बैठकीसाठी आवश्यक त्या सर्व अभिलेखासह न चुकता उपस्थित रहावे. सदर प्रकरणात या कार्यालयाच्या वतीने वारंवार आपल्या कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात येत असून त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्यामुळे प्रकरणात वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुहे प्रकरणात विलंब टाळावा अन्यथा आपल्या विलंबामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.