सोन्याचे दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाने पँसेंजरला प्रामाणिकपणे केली परत
कोल्हापूर (प्रतिनिधी) पंचगंगा रिक्षा स्टॉपचे रिक्षा चालक सुरेश दिनकर तोरस्कर राहणार जैन मठ अवधूत गल्ली शुक्रवार पेठ यांच्या रिक्षात काल दुपारी १:०० वाजले चे दरम्यान नागराज रिक्षा स्टॉप येथून नाशिक येथील पॅसेंजर विष्णुपंत आदमाने लक्ष्मीपुरी येथे जाण्यासाठी त्यांच्या रिक्षात बसले. असता पाच तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरले होते. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता सोन्याचे दागिने होते. त्यांनी इतर पाहणी केली असताना त्यात त्यांना फोन नंबर मिळाला त्यांनी पँसेंजरला फोन करून प्रामाणिकपणे सोन्याचे दागिने असलेली बॅग परत केली.
कोरोणाच्या काळात रिक्षावाल्यांची परिस्थिती फार बिकट व हलाखीची असताना सुद्धा हा प्रामाणिकपणा कोल्हापूरच्या शाहूनगरीतच घडू शकतो. त्यांचा या प्रामाणिकपणाबद्दल आज पंचगंगा रिक्षा स्टॉप यांच्यातर्फे नंदकुमार मोरे (आण्णा), किशोर घाडगे, रियाजभाई बागवान यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचगंगा रिक्षा स्टॉपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.