शिंदखेडा नगरपंचायतच्या वतीने गाळे धारकांवर कार्यवाहीचा बड़गा ; पुन्हा आठ गाडे सील व एक नळकनेक्शन कट
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायत च्या वतीने दुसर्यादा शिंदखेडा शहरातील गाळे धारकांवर जागा भाडे वसूली पोटी कार्यवाही नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. थकबाकी भारण्याची मुदत ३१ मार्च ला संपून देखिल रक्कम न भरल्यामुले शहरातील ८ गाळे सील करण्यात आले. तसेच १ हाॅटेल चे नळ जोडणी खंडित करण्यात आली. तसेच थकबाकी रकमेचा भरणा केल्यामुळे २ गळ्यांचे सील पुन्हा काढून देण्यात आले.
यापुर्वीदेखील मागील आठ गाडे सील केले होते.शहरात एकुण 150 गाडे असुन देखील बहुतेक गाडेधारकावर मोठया प्रमाणावर थकबाकीदार आहेत. इतर गाळे धारकानी थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास सदर कार्य वाही अशीच चालू ठेवणार असल्याचे मुख्यधिकारी प्रशांत बिडगर यांनी सांगितले. सदर वसूली पथकात प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वात कर निरीक्षक वामन अहिरे, मनोज पाटिल, पंडित माळी, हर्शल मराठे, नरेंद्र बड़गूजर, अशोक माळी, दीपक महाजन, गोविंदा पाटोले, राजू माळी, सुनील पाटोले, गोकुल गिरासे आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.