महाराष्ट्र
वरणगाव शहरात महावितरणतर्फे लोडशेटींग सुरु
भुसावळ (प्रमोद बावस्कर) वरणगाव शहरात म.रा.वी.वि. कंपनी मर्यादिततर्फे लोडशेडिंग सुरू करण्यात आलेली असून वरणगाव शहराचा वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा ग्रुप डी ग्रुप मध्ये असल्या कारणास्तव लोडशेडिंग टाइमिंग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार सकाळी ११ ते १ व संध्याकाळी ५ ते ६ असा आहे व शुक्रवार शनिवार रविवार सकाळी १०:३० ते १२ व संध्याकाळी ३:३० ते ५.०० असा आहे
याव्यतिरिक्त १३२ केव्ही उपकेंद्र फॅक्टरी येथून (ELR) इमर्जन्सी लोड रिलीफ म्हणून कधीही ग्रिड कडून मेसेज आल्यास लाईट बंद करण्यात येते (अघोषित लोड शेडींग) तरी सदरची परिस्थिती ही कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपाची कोळशाचा तुटवडा असल्या कारणास्तव आहे असे सूत्रांकडून कळत आहे. त्यासाठी सन्माननीय वीजग्राहक वरणगाव शहर यांना आवाहन करण्यात येते की म.रा.वि.वी.ला सहकार्य करावे.