पराक्रमी वीरांचा इतिहास वाचनातून समजून घ्यावा : रवींद्र पाटील
चोपडा (विश्वास वाडे) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.एस. कोल्हे यांच्या हस्ते ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बी.एच. देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्फूर्तीदायक अशी कवितेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे, पर्यवेक्षक एस. पी.पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम.पाटील, एम जी पाटील, एम. टी. शिंदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.पी.के.लभाने, डॉ. ए.बी सूर्यवंशी, प्रा.डी. एस.पाटील, डॉ.व्ही.आर.हुसे, डॉ.आर.आर.पाटील, संदिप पाटील, के.एस. क्षीरसागर, डी.डी.कर्दपवार, संदीप देवरे आदि उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रवींद्र पाटील यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख सुनीता बी. पाटील यांनी केले. यावेळी ऑनलाइन कार्यक्रमात माजी इतिहास प्रमुख डी. बी.पाटील यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘शिवजयंतीपासून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांचा एक एक गुण आत्मसात करावा व समाज परिवर्तनासाठी आपले योगदान द्यावे’.
यावेळी शिवचरित्रकार रवींद्र तुकाराम पाटील म्हणाले की, अंदाधुंदी च्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले ही महत्वपूर्ण बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासह अवघ्या जगासाठी संशोधनाचा, चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठ नेतृत्वामुळेच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. परकीय आक्रमणामुळे स्वाभिमानी व कर्तव्यशून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले.म्हणूनच पराक्रमी वीर पुरुषांचा आजच्या पिढीने वाचनातून समजून घ्यायला हवा’.
यावेळी एन.एस. कोल्हे आपल्या अध्यक्षीय मनोगताप्रसंगी म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीतून पुढे गेले पाहिजे. संशोधकांनी शिवरायांचा खरा इतिहास शोधून काढायला हवा. शिवरायांनी स्वतःच्या हिमतीने स्वराज्य स्थापन केले हा क्रांतीकारक बदल खूप मोठा असून शस्त्र हातात घेऊन शस्त्रबंदी तोडली ही असामान्य गोष्ट होती. सध्याक्रांतिकारी विचारांची लढाई लढायची असून त्यासाठी हातात लेखणी घ्यावी लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. बी.बडगुजर यांनी केले तर आभार बी. एच. देवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. एल. भुसारे, एस एन पाटील, नेहा राजपूत यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.