सोयगाव येथे आज बाबा रामदेव यांचा विशाल भव्य जम्मा जागरण कार्यक्रमाचे आयोजन
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन
सोयगाव : सोयगाव शहरात हैद्राबाद येथील सुप्रसिद्ध गायक सुशील गोपालजी बजाज प्रस्तुत श्री. रामदेवजी यांचा विशाल भव्य जम्मा जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोयगाव येथे पहिल्यांदाच श्री बाबा रामदेवजी यांचा जम्मा जागरण कार्यक्रम होत असून राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोयगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहे. या ठिकाणी महिला – पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून प्रखर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोयगाव मध्ये बाबा रामदेव यांचा पहिल्यांदाच जम्मा जागरण होत असल्याने भविकभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.