दिल्ली (विशेष प्रतिनिधी) खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या नवीन मराठी चित्रपटाच्या दिल्लीतील विशेष स्क्रिनींगचे निमंत्रण देण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कडे गेले होते. यांनतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या नंतर माध्यमांसमोर बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी अमित शहा हे केंद्रात सत्येत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक असल्याचे म्हटले. त्यानंतर ते बोललेत कि काही मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्यांचे सोबत असणे महत्वाचे असते.
सीबीएससीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास असावा अशी खंत व्यक्त करत. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही. अशा मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रभावी पाठबळ असावं लागतं. असेही खासदार अमोल कोल्हे या वेळी बोलले. डॉ अमोल कोल्हे यांनी अमित शहा यांना प्रभावशाली नेता म्हटल्याने राजकीय वर्तुळात खासदार अमोल कोल्हे पुढे भाजपात जातात का अशा चर्चा रंगल्या आहेत.