महाराष्ट्र
नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
नाशिक (मनोज साठे) गेली दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणाऱ्या अवकाळी पावसाने काल सायंकाळी शहरात वीजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. आज दिवसभर वातावरण कोरडे होते मात्र सायंकाळी अचानपणे ढग दाटुन येऊन जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते. शहरातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तर रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक कोंडी सुध्दा झाली तर काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य दिसून आले. सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या सर्व भागात पावसाचा जोर दिसुन आला.