अशोक खेडकर व लतीफ शहा यांची स्विकृत नगरसेवकपदी वर्णी
सोयगाव (विवेक महाजन) सोयगाव नगर पंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे अशोक खेडकर व लतीफ शहा यांची निवड करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच स्वीकृत सदस्य पदासाठी खेडकर व शहा यांच्या नावाची घोषणा केली होती. स्वीकृत सदस्य निवडी संदर्भात आज प्रक्रिया पार पडली.
सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यानंतर गटनेता निवडीच्या वेळी भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. आणि आज देखील शिवसेनेचे अशोक खेडकर व लतीफ शहा या दोघांची स्वीकृत सदस्य पदी वर्णी लागल्याने नगर पंचायतीत शिवसेनेकडे आता 17 पद झाली असून भाजप कडे आता केवळ 2 सदस्य उरले आहेत.
दरम्यान स्वीकृत सदस्य पदाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित स्वीकृत सदस्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, हर्षल काळे, दिपक पगारे, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, गजानन कुडके, शेख शाहीस्ताबी, संध्याताई मापारी, कुसुम दुतोंडे, वर्षाताई घनघाव, ममताबाई इंगळे, शहा आशियाना, अमोल मापारी, भगवान वारंगणे, विक्रम चौधरी, राजू दुतोंडे, कदीर शहा, किशोर मापारी, समद शहा, राहुल राठोड, यशवंत जाधव, विष्णू इंगळे, योगेश नागपुरे, दत्तू इंगळे, जीवन पाटील, भारत तायडे, दिनेश काळे, पंजाब कुणघर, विजय बिर्ला, संजय आगे, विकास काळे, नारायण घनघाव, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.