महाराष्ट्र
सोयगाव बस स्थानक परिसरात पाणपोई सुरू
सोयगांव (विवेक महाजन) संत श्री आसाराम बापू साधक परिवारातर्फ अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या वतीने सोयगांव बसस्थानक व तहसील कार्यालय समोर अशा दोन ठिकाणी पाणपोई सुरु करुन तालुक्यातील खेड्या पाडयांतून येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व शीतल पाण्याची सेवा सुरु करण्यात आली.
दि.२ शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगरसेवक राजू दुतोंडे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजसेवक राजेंद्र आहिरे, राजू दुतोंडे, सुधीर पठाडे, पत्रकार दिलीप शिंदे, सुधाकर सोहनी, एकनाथ चौधरी, केंद्र प्रमुख मोती जोहरे, सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, योगेश बोखारे, आकाश वरकड, मच्छिन्द्र मामा महाले, भगवान पंडित, उमेश देहाडराय, संदीप सोहनी, गणेश क्षीरसागर, हरीश सोहनी, सतीश बोडखे आदी उपस्थित होते.