किनगाव येथील सैन्य दलातील सैनिकाच्या सेवानिवृत्ती सोहळा
यावल : भारतीय सैन्य दलात प्रदीर्घ अशी २3 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले जवान कासम हसन तडवी यांचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला.
किनगाव ता. यावल जि.जळगाव येथील सैन्य दलात दाखल झालेले जवान कासम हसन तडवी यांनी अत्यंत तळमळीने आपल्या देशाची देशसेवा केली. ज्या ठिकाणी त्यांची सेवानिवृत्ती झाली ती म्हणजे कुज बिहार आसाम फ्रंट इयर येथे त्यांनी शेवटची सेवा बजावली. यापूर्वी त्यांनी आपला 23 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गुजरात आसाम राजस्थान पंजाब जम्मू-काश्मीर बांगलादेश बॉर्डर इतर ठिकाणी आपली देशसेवा केली. ज्या रोजी त्यांची सेवानिवृत्ती झाली. त्या निमित्ताने प्रारंभी यावल बस स्टॅन्ड ते किनगाव बस स्टॉप पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती.
तसेच किनगाव येथे उपस्थित माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जी.प.सदस्य आर आर पाटील, पंचायत समिती उप सभापती यावल अरुण पाटील, किनगाव बू व खुर्द सरपंच उपसरंच सर्व सदस्य, पोलिस पाटील, कासारखेडा सरपंच व उपसरपंच पोलिस पाटील वाघझिरा सरपंच तसेच सर्व ग्रामस्थ व पाहुणे मंडळीप्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पमाला देवून यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामपंचायत कमेटी व इतर मान्यवर प्रतिष्ठीत नागरिक, थोर-मोठे व्यक्ती तसेच सर्व मित्र परिवार यांच्या हस्ते देखील सेवानिवृत्त जवान यांचा सत्कार करून संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सदर जवानाच्या आई च्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले. त्याच प्रमाणे याकामी मित्र परिवारातील आलेली मित्र मंडळी आणि इतर सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.