अब्दुल आमेर यांच्याहस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन
केअर क्लबच्या वतीने राबविण्यात आला सामाजिक उपक्रम
सिल्लोड : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शहरातील केअर क्लब संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या युवकांचा तसेच कोविड काळात जीवाची बाजी लावून रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मेघा शाह, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, अन्वी गावचे सरपंच डॉ. दत्तात्रय भवर, वैदयकीय अधीक्षक डॉ. बाबुराव मोरे, शैलेश गौर, फहिम पठाण, सुनीता आरके, स्वप्नील शेळके, बॉबी चौधरी,अमान देशमुख,शुभम काकडे यांच्यासह केअर क्लबचे अध्यक्ष अजीम पठाण, वसीम शेख, अयाज पठाण, तालेफ शेख, अजीज शेख, निजाम शेख, अकबर पठाण, वसीम पठाण, अजहर शेख, अरबाज अली, गोरख बकले, संजय शेळके आदींची उपस्थिती होती.