शिंदखेडा नगरपंचायती वर दूषित पाणी पुरवठयामुळे असंख्य संतप्त महिलांचा मोर्चा ; दोन दिवसांचे आश्वासन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील विविध वॉर्डातील महिलांची अशी तक्रार केली की, शिंदखेडा नगरपंचायत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा दुर्गंधीयुक्त,क्षारयुक्त व अत्यंत घाणेरडे अशा प्रकारच्या पाणी या शिंदखेडा शहरांमध्ये पुरविले जात आहे.
या संदर्भात काही वार्डातील नगरसेवक यांनी या आधीच अनेकदा मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन व तोंडी तक्रार केली होती. ते पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन शहरातील नागरिकांना दवाखान्यांमध्ये रांग लावावी लागत आहे.शहरांत आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे तरी प्रशासन मात्र सुस्त कुंभाकर्ना सारखे गाढ झोपेत आहे. जर का या आरोग्यवह्या समस्या हाताबाहेर गेल्या तर त्यांस जबाबदार कोण राहील ? अशी विचारणा अक्रोस्थ महिलांनी केली. प्रत्येक वॉर्डात पाणी सोडण्याची वेळ ही ठरलेली असावी अनियंत्रित पाने कधीही पाणी सोडले जाते. प्रत्येक कुटुंबास पाणीही मिळत नाही अशी भयानक परिस्थिती या रखरखत्या उन्हात झालेली आहे. उन्हामुळे जीव अगदी मेटाकुटीस आलेले नागरिक पाण्यामुळे घरचे थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे अशा स्थित अडकले आहेत.
शिंदखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष गटनेते व मुख्याधिकारी साहेब यांनी दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन दाखवावे अन्यथा स्वच्छ पाण्याचा पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा.जर का दोन दिवसात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही तर शिंदखेडा नगरपंचायती वर असंख्य महिलांसोबत हंडा मोर्चा काढून जोपर्यंत पिण्याचा स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन देण्यात येईल ही नगरपंचायत प्रशासनास विनंती केली गेली.
यासंदर्भात असंख्य महिलांनी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष दीपक देसले, अॅड निलेश देसले यांची भेट घेऊन त्यांची तक्रार समजून नगरपंचायती वर जाऊन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना फोनवरून सविस्तर तक्रार त्यांच्या कानावर टाकली असता आज दि २५ मे रविवार असल्या कारणामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही पण संबंधित तक्रार ऐकून त्यांनी नगरपंचायतीचे मनोज पाटील नामक कर्मचारी यांना पाठवून आमची तक्रार समजून घेऊन नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या वतीने दोन दिवसाचं आश्वासन देण्यात आले आहे की दोन दिवसात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.याप्रसंगी शेकडो महिला नगरपंचायत प्रांगणात जमा झाल्या होत्या.