शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगरपालीका निवडणुकीत-नवीन प्रभाग रचनेमुळे अनेकांची तारांबळ
सर्वसामान्य नागरिकांसह-आजी-माजी- भावी-इच्छुक उमेदवार हरकती घेणार?
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील- दोंडाईचा येथे शहराची वाढती लोकसंख्या-रहिवाशी एरिया व नवीन प्रभाग रचनेमुळे, आगामी होऊ घातलेल्या नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या इच्छुक-भावी उमेदवारांची तारांबळ उडाली असुन लोकांनी प्रभाग रचनेपेक्षा वार्ड रचनेला पंसती देत आहे. पण सत्तेपुढे शहाणपण थोडे,असे म्हणत, १७ मार्चच्या आत अनेक इच्छुक व भावी उमेदवार हरकती घेणार आहेत. मात्र पक्षप्रमुख व नेतेमंडळी यांची साथ मिळत नसल्यामुळे, त्यांच्या कार्यालय अथवा घरी स्मशान शांततेचे चित्र दिसत असल्याची बोंब कार्यकर्ते व उमेदवार मंडळी गावात करित आहे.
दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेत तत्कालीन सत्ताधारी गटाचा कार्यकाळ मागील वर्षी म्हणजे २६ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला असुन २८ डिसेंबर २०२१ पासुन दोंडाईचा नगरपालीकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. म्हणून आज जवळपास अडीच महिन्यांपासुन गावाचा व नगरपालीका प्रशासनाचा कारभार प्रशासकीय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार पाहत आहे.

मात्र अशा परिस्थितीत एकीकडे राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसताना, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय सार्वत्रिक निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला असताना, दुसरीकडे निवडणुक आयोगाने राज्यातील सार्वत्रिक निवडणुकींची प्रक्रिया पुर्ववत ठेवली आहे. म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेची प्रभाग रचना १० मार्च रोजी पासुन जनतेसाठी सार्वत्रिक पटलावर जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ज्याला कोणाला हरकती-नोंद-तक्रार करायची असेल त्यांना १७ मार्चपर्यंत दोंडाईचा नगरपालीकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात एकीकडे सर्वसामान्य जनता व इच्छुक भावी उमेदवारांमध्ये नगरपालीका निवडणुकीचा उत्साह आहे. तर दुसरीकडे नवीन प्रभाग रचनेमुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. कारण अनेक प्रभाग हे भौगोलिक दृष्ट्या तपासणी न करता-नदी-नाले व वयोवृद्ध मतदाराचा हिशोबाने मोठ्या अंतराचा विचार करता फक्त न फक्त तत्कालीन सत्ताधारी यांना त्याचा कसा लाभ होईल. ह्या दुष्टीकोनातुन जोडण्यात आले आहे,अशी ओरड मात्र भावी-इच्छुक उमेदवार गावात करत आहे. म्हणजे राज्यात सत्ता कोणाचीही असो मात्र प्रशासनावर पावर इम्पॅक्ट मात्र स्थानिक नेत्याचाच आहे. हे मागे नगरपालीकेवर प्रशासकीय अधिकारी तहसीलदार तथा अप्पर तहसीलदार- यांच्या अदला-बदलीच्या कारभारावरून जनतेला लक्षात आल्याचे म्हटले जात आहे. म्हणून आताही जी नवीन प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यात खतपाणी तत्कालीन सत्ताधारी यांनी घातले आहे. त्यामुळे दोन वार्ड मिळून एक नवीन प्रभाग रचना आखताना भौगोलिक दृष्ट्या तपासणी- नदी-नाले- वयोवृद्ध मतदार यांच्या हिशोबाने अंतराचे विचार न करता तसेच ज्यांना जनतेच्या सेवेसाठी उमेदवारी करायची आहे. त्यांच्याही वर्षानुवर्षे समाजसेवा करण्याचा हद्दी-संपर्क किंवा पुर्वी ज्या वार्डात जो नगरसेवक निवडत होता.त्या नगरसेवकाचे हक्काचे वोटींग नदी पलीकडील वार्डात टाकले गेले. म्हणजे ना हा नगरसेवक हक्काने निवडू शकतो, ना तो नगरसेवक हक्काने नदीपलीकडेल मतदानावर निवडू शकतो.कारण वर्षानुवर्षे हे नगरसेवक नदीपलीकडेल त्या वार्डात कधीच फिरकले नाही आहेत,अशी कमीत कमी एक-चार-पाच-नऊ-अकरा-बारा असे एकूण सहा प्रभागात मतदार विभागले गेले आहेत. ज्यांच्यात इकडचा मतदार नदीपलीकडील वार्डात जोडला गेला आहे. तसेच बरेच प्रभागात मतदारांची लोकसंख्या वाढून तीन हजार ते चार हजार झाली आहे. त्यात प्रभाग क्र.-१-३१५५,प्रभाग क्र.-२-३४०२,प्रभाग क्र.-३-३७११,प्रभाग क्र.५-३८६६,प्रभाग क्र.-६-३७९५,प्रभाग क्र.-८-३६४०,प्रभाग क्र.-९-३६१७,प्रभाग क्र.-१०-३१७५,प्रभाग क्र.-११-३४१७,प्रभाग क्र.-१२-३२७२,प्रभाग क्र.-१३-३५६९ तर दोन प्रभागात मतदारांची संख्या चार हजाराच्या वरती आहे. जसे प्रभाग क्र.-४-४२७५, प्रभाग क्र.-७-४२५४ अशी आहेत. त्यामुळे नवीन इच्छुक उमेदवारांसह सराईत नाव-इज्जत-पैसा कमविणारे नगररसेवकही बुचकाळ्यात पडलेले आहेत की,इतक्या लोकांची जनसेवा-धनसेवा-विकास सेवा कशी करायची.मात्र यावर्षी नगरसेवकांमधुन नगराध्यक्ष पदाची निवड असल्याने, आजपर्यंत नेतेमंडळींनी व पक्ष प्रमुखांनी घरातलाच व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी दिला असल्याने, त्यांनाही इच्छुक-भावी उमेदवारांच्या अडचणींची- निर्माण झालेल्या प्रश्नांची काही पडलेली नाही आहे, असे उमेदवार चौका-चौकात म्हणत आहे. म्हणून नेतेमंडळी व पक्ष प्रमुखांच्या कार्यालयपुढे कोणतीही चर्चा-मिटींग होत नसल्याने,हरकती घेण्यासाठी थोडेच-बोटांवर मोजता येतील. ऐवढे दिवस बाकी असताना स्मशान शांतता पसरलेली दिसत आहे.



