शिंदखेडा येथील आपले सरकार सेवा केंद्र, सचिन महा ई सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र व SBI ग्राहक सेवा केंद्रास विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णीची भेट
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथे आज चित्रा विकास कुलकर्णी विभागीय आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग धुळे जिल्हा दौऱ्यावर आढावा घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र व सेतू कार्यालय शिंदखेडा येथे भेट दिली.
भेटी दरम्यान शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे, यांचे PA सचिन पोतदार व MAHA IT चे जिल्हा समन्वयक राहूल वाघ यांनी केंद्रावर आढावा घेत असताना आयुक्त चित्रा कुलकर्णी हे अतिशय समाधानी झाल्यात. आणि स्वतः केंद्र चालक विजय मोरे यांच्याशी शासकीय व निमशासकीय कोणकोणत्या सेवा दिल्या जातात व जन सामान्यापर्यंत आपल्या सेवा कशा द्यावे हे मार्गदर्शन केले व आपले सरकार सेवा केंद्र संचालक विजय मोरे व सर्व सहकारी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद माळी शिरपूर, अरुण मोरे, प्रतिभा मोरे, मनिषा मोरे, धनराज कसबे, धनराज वाघ यांनी परिश्रम घेतले. केंद्रसंचालक विजय मोरे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले.