शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचालक मंडळास मान्यतेचे शिक्कामोर्तब
अध्यक्षपदी स्वप्निल रमेश देसले, उपाध्यक्ष हसनभाई शामशी तर सचिवपदी आनंदा एकनाथ चौधरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील नामांकित शिक्षण संस्था शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचालक मंडळाच्या कार्यकारिणी बाबत सहाययक धर्मदाय आयुक्त क्रमांक एक यांच्या न्यायालयात शिक्का मोर्तब झाले असून निर्णयाचे शिंदखेडा शहरासह तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे . सन -2014 ते 2019 ची संचालक मंडळ कायम करण्यात आले.
त्यात अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले, उपाध्यक्ष हसनभाई हातीमभाई शामशी, सचिव आनंदा एकनाथ चौधरी, संचालक डाॅ.नारायण पोपट पाटील, डाॅ शिवराम नथ्थु बागूल, आधार महारु पाटील, खुशालचंद गुलाबचंद ओसवाल, अरविंद मोहनलाल देसाई, डाॅ.अकील नोमानी.प्रा. प्रदीप वासुदेव दिक्षित, दिपक सुधाकर देसले, चंद्रशेखर जगन्नाथ चौधरी, गिरीषभाई फुलचंददास शाह, यशवंत वंजी पवार, शैला रमेश देसले हे मंडळास अधिकार दिले.
सविस्तर वृत्त असे की, जून सन 2012 च्या काळात डॉ रमेश देसले यांनी संचालकांची सभा घेऊन कार्यकारिणी निर्माण केली व कायदेतज्ञा अॅड. प्रमोदकुमार दीक्षित यांच्या माध्यमातून सहाय्यक धर्मदाय आयुक्त क्रं एक यांच्या न्यायालयात मंजुरी साठी दाखल केली सर्व चौकशीअंती न्यायालताने कार्यकरिणीस मंजुरी दिली मात्र तेंव्हा पासून वेगवेगळ्या न्यायालयाचा आधार घेत आजपावेतो ही न्यायालयीन लढाई सुरूच राहिली व आज डॉ रमेश देसले यांच्या गटालास शिक्का मोर्तब होऊन मान्यता मिळाली आहे
दरम्यान विरोधी गटातील इतरांनी निवडणुकी बाबत न्यायालयात धाव घेतली मात्र अनेक वेळेस त्यांना अपयशच आले उच्च न्यायालयात सदर प्रकरण जाऊन पोहोचले प्रसंगी मेहेरबान नामदार उच्च न्यायालयाने डॉ रमेश शिवदास देसले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात यावी असा आदेश केला त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला निवडणूक प्रक्रिया सांभाळण्यासाठी निरीक्षक म्हणून पी आर लांडगे यांची नियुक्ती झाली मात्र ते अनुपस्थित राहिले मात्र मेहेरबान नामदार उच्च न्यायालयाने डॉ रमेश देसले यांनाच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्यात दहा सदस्य निवडून आल्याचे घोषित करण्यात आले व त्यानुसार निवडून आलेल्या कार्यकरिणीस मान्यता मिळावी म्हणून फेरफार अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्त धुळे यांच्या न्यायालतात क्र 690/2014 नुसार दाखल केला मात्र ज्यांना निवडणूक घेण्याचे कोणतेही अधिकार नसतांना निवडणूक दर्शवून कार्यकारिणी फेरफार अर्ज क्र 694/2014 नुसार सहाययक धर्मदाय आयुक्त धुळे यांच्याकडे अर्ज दाखल केला
याबाबत सहाययक धर्मदाय आयुक्त क्र एक नीलिमा आर मालोदे यांच्या न्यायालयात कामकाज चालले दोनही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन डॉ रमेश शिवदास देसले यांनी दाखल केलेला फेरफार अर्ज 690/2014 यास मंजुरी देण्यात आली तर ज्यांना निवडणूक घेण्याचे अधिकार नसतांना फेरफार अर्ज जो बनावट व बेकायदेशीर होता होता तो फेटाळण्यात आला व अखेर अधिकृत शिक्का मोर्तब डॉ रमेश देसले यांचा फेरफार अर्ज क्र 690/2014 यास मंजुरी देण्यात आली मात्र हा आनंद मिळवण्यासाठी आज डॉ रमेश देसले हयात नाही त्यांचा कोरोना काळात गेल्या वर्षी मृत्यू झाला मात्र त्यांच्याच काळात 2019 ते 2024 या कालावधीत घटने प्रमाणे कार्यकारी मंडळ निवडून आले असून त्या करिता फेरफार अर्ज क्र 72/2020 प्रलंबित आहे मात्र सध्या मंजूर कार्यकारी मंडळ कामकाज बघत आहे डॉ. रमेश शिवदास देसले यांची कायदेशीर व भक्कम बाजू मांडून न्यायालयाकडून न्याय मिळवून देण्याचे काम धुळे येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. प्रमोदकुमार दीक्षित यांनी अभ्यासपूर्ण कामकाज पाहिले तर त्यांना अॅड. प्रथमेश दीक्षित यांनी मोलाचे सहकार्य दिले
न्यायालयाच्या आदेशानुसार व हाती आलेल्या निकालानुसार अधिकृत संचालक मंडळाने संस्थेच्या प्रत्येक युनिटला जाऊन शालेय कामजज व संस्थेची भूमिका याबाबत उहापोह केला. तर संस्थेच्या माध्यमातून अनेक वादविवाद बाजूला सारून प्रगती साठी एक दिलाने नव्या जोषाने विद्यार्थी संख्या वाढीस तसेच संस्थेचे नावलौकिक प्राप्त होण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेवुन सर्व कर्मचारी वर्गाने काम सुरू करावे.चांगल्या कामांची पावती निश्चितच मिळेल असे विद्यमान अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले यांनी सांगितले. प्रसंगी मान्यताप्राप्त संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या संस्थेच्या निकालाबाबत तालुका शहर व जिल्ह्यात मोठीच उत्सुकता होती अखेर या निकालावर सहाययक धर्मदाय आयुक्त क्र एक नीलिमा आर मालोदे यांनी अधिकृत शिक्का मोर्तब केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे तर सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे. अशी माहिती झालेल्या पत्रकार परिषदेला देण्यात आली.