रेणुका परदेशी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली त्याबद्द्ल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न
सोयगाव (विवेक महाजन) सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे दि.२९ मंगळवार रोजी गावांची भुमीपुत्री रेणुका देविदास राजपुत (परदेशी) यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली. त्याबद्दल सोयगाव तालुका प्रशासकीय यंत्रणा व कंकराळा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास सोयगाव तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, विस्तार अधिकारी साळवे,सोयगाव शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर (आबा) काळे, तालुका संघटक दिलीप मंचे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, पंचायत समिती सदस्य संजिवन सोनवणे, कंकराळा लोकनियुक्त सरपंच चंदाताई राजपुत, उपसरपंच मनिषा जैस्वाल, ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड, मुख्याध्यापक एस.आर.खाकरे, डॉ.विनोद धनावत, देविदास राजपुत, माजी सरपंच शिवदास राजपुत, रामदास राजपुत, भगवान कडेवाळ, युवा सेनेचे कुणाल राजपुत, कंकराळा येथील पोलीस पाटील उज्वलाताई बिंदवाल, रुमसिंग राजपुत, संतोष राजपुत, दिलीप देसाई, राजू तिडके, प्रदीप जैस्वाल, विकास देसाई, डॉ.दिनकर पिंगाळकर, मोतीलाल घुसिंगे, गणेश मंचे, एकनाथ पाटील, प्रकाश पाटील, अंगणवाडी सेविका बिंदवाल, ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे, नारायण उबाळे, सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, पत्रकार योगेश बोखारे, कौतिक सपकाळ आदी गावातील नागरिक व महीला उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप मंचे यांनी केले तर आभार देविदास राजपूत यांनी मानले.