शिरपूर येथे व्यसनमुक्ती क्रिटिकल कंडिशन व्यसनमुक्ती उपचारासाठी विशेष उपचारार्थ शिबिराचे डाॅ. कृष्णा भावले यांच्या उपस्थितीत आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील विरदेल येथून सुरुवात झालेल्या व्यसनमुक्ती अभियानाची व्याप्ती महाराष्ट्र सह गुजरात राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. जवळपास ७० हजार रुग्णावर उपचार करून व्यसनाधीन पासून कुटुंबातील सदस्याना जिवदान देण्याचे काम औरंगाबाद येथील डाॅ.कृष्णा रामचंद्र भावले यांच्या माध्यमातून होत आहे.
विरदेल ता.शिंदखेडा येथे स्थित राहून मोजक्याच रुग्णावर उपचाराची सुरुवात केली होती.त्या व्यसनमुक्ती ची व्याप्ती आज मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. आणि फलित होत आहे. त्या पाश्वभुमीवर शिरपूर येथील उदया सकाळी 10 ते 3 या वेळेस सुदर्शन मेडिकल अॅड जनरल स्टोअर्स बसस्थानक जवळ मेन रोड येथे विशेष व्यसनमुक्ती क्रिटिकल कंडिशन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यात वारंवार उपचार घेऊन दारु इच्छा बंद न होणे. लिव्हर, किडनी, कावीळ, स्वादुस्वाद आदी संबंधीत दारुमुळे उद्धवलेल्या समस्या ,मानसिक समस्येवर विशेष उपचार करण्यात येणार आहेत.48 तासात दारुची इच्छा व भावना बंद करणारी बंद करणारी हार्मोन्स बॅलन्स थेरेपी संपूर्ण आयुवैदिक उपचारानंतर हमखास व्यसनमुक्त होतो. असा केला असून आतापर्यंत 70 हजारावर रुग्णांवर उपचार करून रुग्ण बरे होवून व्यसनमुक्त झाले आहेत.म्हणुन जास्तीत जास्त व्यसनाधीन व कुटुंबातील सदस्यानी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन डाॅ.कृष्णा भावले यांनी केले आहे.