खान्देश गांधी बाळूबाई मेहता विद्यालयात मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा
कासारे (प्रतिनिधी) येथील खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयात मातृ-पितृ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या प्रेरणेने प्राचार्य व्ही आर देसले यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची विधिवत पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासारे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासाहेब रमाकांतजी देसले होते. याप्रसंगी पुलवामा हल्ल्यातील शाहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच गावातील लष्करातील जवानांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना प्राचार्य व्ही आर देसले यांनी आई-वडिलांचे संस्काराचे महत्त्व पटवून दिले. व्ही व्ही भामरे यांनी मातृ-पितृ पूजनाचे महत्व विशद केले. याप्रसंगी वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक पालक सपत्नीक उपस्थित होते. विद्यालयाचे माजी शिक्षक एल आर कुलकर्णी यांनी शास्त्रोक्त पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एम सूर्यवंशी, यांनी केले. बी जी पोतदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य व्ही आर देसले, उपप्राचार्य बी डी पाटील, पर्यवेक्षक गांगुर्डे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.