राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कोटनांद्रा, देऊळगाव बाजार येथे 5 कोटी 50 लाख रुपयांच्या विविध विकास उदघाटन संपन्न
सिल्लोड : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा, देऊळगाव बाजार येथे 5 कोटी 50 लाख रुपयांच्या मंजूर विविध विकास कामांचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार (दि.5) रोजी संपन्न झाले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, सहकारी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन एकनाथ पा. गरुड, पं. स.माजी सभापती डॉ. संजय जामकर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, भराडीचे उपसरपंच गजानन महाजन यांच्यासह जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, शाखा अभियंता अशोक शाखावार, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता यतीन कोठावळे, शाखा अभियंता राजधर दांडगे, अभियांत्रिकी सहाय्यक एकनाथ शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोटनांद्रा , देऊळगाव बाजार येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात विविध विकास कामांसाठी जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून 500 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर स्तरावर आहेत. तालुक्यातील शेतकरी दोन पिके घेता यावी यासाठी सिंचनाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून कोटनांद्रा येथील नदीवर 3 ठिकाणी गेटेड सिमेंट नाला करण्यासाठी 1 कोटी 60 लाख तर देऊळगाव बाजार येथील नदीवर गेटेड सिमेंट नाला बांधकामासाठी 58 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सारख्या सूक्ष्म सिंचनाची साधने वापरून पाणी आडवा पाणी जिरवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कोटनांद्रा येथे कोटनांद्रा ते तळणी पुलासह रस्ता करणे 25 लाख, कोटनांद्रा येथे तलाठी कार्यालय व निवास्थानांचे बांधकाम करणे 25 लाख, कोटनांद्रा वाडी फाटा ते तळणी शिवार रस्ता करणे 46 लाख, कोटनांद्रा येथील नदीवर 3 साखळी गेटड सिमेंट नाला बांधकाम करणे 1 कोटी 60 लाख तर देऊळगाव बाजार येथे सावखेडा बु ते देऊळगाव बाजार ( गरुड वाडी मार्ग ) पुलासह रस्ता करणे 50 लाख, संरक्षण भिंतीसह देऊळगाव बाजार आमठाणा रस्त्यावरील देऊळगाव बाजार गावाजवळील नदीलगतचा रस्ता करणे 1 कोटी, देऊळगाव बाजार ते पेंडगाव रस्त्यावरील 4 पुलांची दुरुस्ती करणे 25 लाख, देऊळगाव बाजार येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे 15 लाख, सरकारी विहीर ते आमठाणा शिव रस्ता करणे 46 लाख, देऊळगाव बाजार येथील नदीवर गेटड नाला बांधकाम करणे 58 लाख असे एकूण 5 कोटी 50 लाख रुपयांच्या मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी देऊळगाव बाजार सरपंच शिवाजी देशमुख,पुंजाराम गरुड ,श्रीराम कुंटे,एकनाथराव गरुड,विठ्ठल कदम, सुरेश सोंने, प्रकाश सोंने, गणेश गरुड, देविदास गरुड,हरीश देशमुख, प्रा.इरफान खान , कृष्णा कुंटे,सिकंदर खान, कलंदर खान, बाबासाहेब देशमुख, शेषराव कुंटे, शैलेंद्र साळवे,अशोक कुंटे,अशोक सीमासे, संदीप राजहंस तर कोटनांद्रा येथे उप सरपंच दादाराव काकडे, सोसायटी चेअरमन संजय काळे, दिगंबर टाकसाळे, लक्ष्मण जंगले, श्रावण निकम , रावसाहेब निकम, तालेफ पठाण, पाशु पठाण, नंदू जामकर, कृष्णा काकडे, विलास निकम, पंडित जगताप आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.