महाराष्ट्र

आदिवासी पाड्यावर प्रकल्प आधारद्वारे कपडे वाटप.

के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान पुणे यांचा संयुक्त उपक्रम

धुळे : “एक हात मदतीचा”* या संकल्पनेतून के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प “आधार” अंतर्गत नगाव गावाजवळील स्थलांतरित आदीवासी वस्तीत वापरायोग्य कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे चे संस्थापक सचिन म्हसे यांच्या वतीने पुण्यात तर के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या स्वयंसेवका दिव्या, ज्ञानेश्वरी, कल्याणी, राखी, स्नेहा, प्रियंका, गौतमी, साक्षी,भाग्यश्री आदींनी धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे कपड्यांचे संकलन केले. तसेच येत्या काळात या वस्तीतील लोकांना आरोग्य तपासणी बाबत शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
यावेळी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, साक्षी बडगुजर, राखी बडगुजर,साक्षी जाधव, हर्षदा जाधव, गौतमी कुलकर्णी, दिव्या बिर्‍हाडे, विजयंता बिर्‍हाडे, कल्याणी मोरे, गणेश शेजुळ, अश्वघोष पवार, प्रसाद महाले, लवेश, निलेश, रवीद्र चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे